दैनिक गोमन्तक
हिवाळ्यात लहानमुलांपासून ते घरातील मोठ्यांपर्यंत सदस्य आजारी पडत असतात.
पण हिवाळ्यात लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा खूपच कमी असते.
अशा वेळेस मुलांच्या आहारात तुम्ही काही सुपरफूड्सचा समावेश करु शकतात.
त्यामुळे त्यांना आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहील.
मुलांना फळांसोबतच पोषक आहारही द्यायला हवा, त्यामुळे इम्यून सिस्टम चांगली राहील.
ज्यामध्ये गुळ, आवळा, खजूर असे पदार्थांचा समावेश करा, गुळ हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी मदत करतो.
तसेच, आवळ्यात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराची इम्यूनिटी वाढण्यात मदत होते.
खजूर खायला स्वादिष्ट असतात, खजूरमध्ये फाइटोन्यूट्रिएंट्स असल्यामुळे इम्यूनिटी वाढण्यात मदत होते आणि आजाराही दूर राहतात.