दैनिक गोमन्तक
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला उबदार ठेवणे खूप महत्वाचे असते.
हिवाळ्यात घरातील वरिष्ठ असो वा लहान मुलं थंडीत पाठदुखीसारख्या समस्या उभ्दवतातच.
थंडीत पाठदुखी आणि सांधेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे लाडू खा.
मेथीचे लाडू खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहण्यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर पोषक तत्वे देतील.
हिवाळ्यात बनवले जाणारे हे खास डिंकाचे लाडू आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात.
लाडू बनविण्यासाठी साखर किंवा गूळ, तेल, खाण्याचा डिंक, काजू, बदाम, खारिक, खोबरं, मेथीचे दाणे, गव्हाचे पीठ हे पदार्थं लागतात.
लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम डिंकाला तेलात तळून पावडर बनवून घ्या, नंतर पीठात टाका.
एका भांड्यात काजू, बदाम, खारिक, खोबरं बारिक करुन मिक्स करा.
सारण थंड करुन लाडू बांधा त्यावर तुमच्या आवडीनुसार सजवण्यासाठी ड्रायफ्रुट्स लावा.
हिवाळ्यात हे लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.
मेथीचे हे लाडू ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज असलेले लोकही खाऊ शकता.