Akshata Chhatre
थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही एक सामान्य समस्या आहे. यावर भारतीय घरांमध्ये आजही वाफ घेणे हा एक सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी उपाय मानला जातो.
वाफ घेतल्याने नाक आणि घशामध्ये उबदार, ओलसर हवा पोहोचते, ज्यामुळे दाट कफ पातळ होतो आणि तो बाहेर काढणे सोपे होते.
चेहऱ्याला भांड्यापासून २५-३० सेमी दूर ठेवा, नाहीतर त्वचेला नुकसान होऊ शकते. ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त वाफ घेऊ नका; जास्त वाफेमुळे त्वचेची नैसर्गिक नमी कमी होते.
थेट उकळत्या पाण्याची वाफ घेणे टाळा, यामुळे त्वचा भाजण्याची शक्यता असते.
साध्या पाण्याचाच वापर करा. एसेन्शियल ऑईलमुळे अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्यांना त्रास होऊ शकतो.
वाफ घेणे हे केवळ तात्काळ आराम देण्याचे आणि श्वसनमार्गातील कोरडेपणा कमी करण्याचे साधन आहे, हे लक्षात ठेवा. संसर्गावर उपचार म्हणून नाही, तर पूरक उपचार म्हणून याचा वापर सुरक्षित आहे.