Akshata Chhatre
हिवाळ्यात चालणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते, ज्यामुळे आपल्याला वारंवार लोशन लावण्याची गरज पडते.
ही त्वचा कोरडी राहिल्यास ती कापली जाऊन लहान जखमा होऊ शकतात. या समस्येवर मात करण्यासाठी, विशेषतः जर तुम्हाला रासायनिक लोशन्स वापरायचे नसतील, तर तुम्ही घरगुती नैसर्गिक क्रीम बनवू शकता.
ही होममेड क्रीम तुमचे पैसे वाचवेल आणि त्वचा हायड्रेटेड व मऊ ठेवेल.
या क्रीमसाठी तुम्हाला फक्त ४ गोष्टींची गरज आहे; कोरफड जेल, बदामाचे तेल, ग्लिसरीन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
या सर्व गोष्टी एका वाटीत घेऊन चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि पांढऱ्या रंगाची, मऊ क्रीम तयार करा.
कोरफड जेल त्वचेला नमी देते आणि अँटी-एजिंग गुणांमुळे सुरकुत्या कमी करते.
बदामाचे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करून सॉफ्ट बनवते. ही क्रीम तुम्ही चेहरा, हात आणि पायांवर कुठेही वापरू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा दिवसभर मऊ आणि फ्रेश राहील.