Sameer Amunekar
उबदार ब्लँकेट आणि रजई
थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात मऊ, जाड आणि उबदार ब्लँकेट किंवा रजई असणे आवश्यक आहे. रात्री झोपताना शरीराला उब मिळण्यास मदत होते.
गरम पाण्याची बॅग
थंडीच्या दिवसांत गरम पाण्याची बॅग खूप उपयोगी ठरते. हात-पायांना शेक देण्यासाठी आणि शरीराला आराम मिळवण्यासाठी तिचा वापर करता येतो.
थर्मॉस किंवा इन्सुलेटेड बाटली
घरात थर्मॉस असल्यास चहा, कॉफी किंवा कोमट पाणी बराच वेळ गरम ठेवता येते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत वारंवार पाणी गरम करण्याची गरज भासत नाही.
स्वेटर आणि उबदार मोजे
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी स्वेटर, कानटोपी, हातमोजे आणि मोजे घरात असणे गरजेचे आहे. विशेषतः रात्री झोपताना पायांना उबदार मोजे घातल्यास आराम मिळतो.
मॉइश्चरायझर आणि लिप बाम
थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होते, तर ओठांना भेगा पडू शकतात. त्यामुळे घरात मॉइश्चरायझर आणि लिप बाम ठेवा. त्वचा आणि ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
आलं, हळद आणि मसाले
हिवाळ्यात चहा किंवा गरम पदार्थांमध्ये आलं, हळद, दालचिनी आणि काळी मिरी यांचा वापर करता येतो. या पदार्थांमुळे जेवणाला चव येते आणि गरम पेयांचा आनंदही घेता येतो.
गरम पाणी करण्यासाठी इलेक्ट्रिक केटल
हिवाळ्यात गरम पाणी, चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक केटल उपयोगी ठरते. कमी वेळेत पाणी गरम करता येत असल्याने रोजच्या वापरासाठी हा एक सोयीस्कर पर्याय आहे. वापरताना सुरक्षिततेची काळजी घ्या.