Akshay Nirmale
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अॅमेझॉन ई कॉमर्स संकेतस्थळाचे संस्थापक जेफ बेझोस (59) त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत.
'अॅमेझॉन'चे संस्थापक बेझॉस लवकरच लॉरेन सांचेझ हिच्याशी लग्न करणार असून हा विवाहसोहळा असामान्य असणार आहे. कारण ते पृथ्वीवर नाही तर अंतराळात विवाह करणार आहेत, असे समजते.
असे झाल्यास अंतराळात लग्न करणारे बेझॉस आणि लॉरेन हे पहिलेच दाम्पत्य ठरेल.
लॉरेन सांचेझ ही एमी पुरस्कार विजेती पत्रकार, निवेदक आहे. तसेच ती हेलिकॉप्टर पायलटदेखील आहे. लॉरेन 53 वर्षांची आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर बेझोससोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकेतच दोघांनी समुद्रात त्यांच्या यॉटवर वीकेंड एन्जॉय करत एंगेजमेंट केली. लॉरेनने बोटात घातलेली हिऱ्याची अंगठीही फोटोत दाखवली आहे.
बेझॉस यांनी लॉरेनला एंगेजमेंटवेळी वीस कॅरटची डायमंडची 20 कोटी 59 लाख 91 हजार 275 रूपयांची अंगठी दिली आहे.
2019 मध्ये लॉरेन आणि बेझॉस यांच्या रिलेशनशिपबद्दल जगाला प्रथमच कळले होते. त्याच वर्षी बेझॉस यांनी पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉटला घटस्फोट दिला होता. हा घटस्फोट महागडा घटस्फोट ठरला होता.