Akshay Nirmale
अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला देखील भारतात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
टेस्लाच्या गाड्या केवळ देशात असेंबल करण्याच्याच नव्हे तर देशात एक सेलिंग बेस तयार करण्याच्या विचारात टेस्ला आहे.
टेस्ला कारचे बहुतांश उत्पादन चीनमध्ये होते. तिथे कंपनीचा ग्राहक बेस आहे आणि मेगापॅक बॅटरी कारखानाही उभारला आहे.
टेस्ला भारताला उत्पादन आणि नवनिर्मितीचे संभाव्य केंद्र म्हणून गांभीर्याने पाहते.
भारत सरकारने टेस्लाला देशामध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक किंवा महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहने (EVs) तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
टेस्ला कंपनी देशात ईव्ही बॅटरीच्या निर्मितीची शक्यताही तपासत आहे.