Akshata Chhatre
आपला जन्माचा जोडीदार प्रतारणा करत आहे ही गोष्ट कुठल्याही स्वाभिमानी व्यक्तीस सहन होऊ शकत नाही.
प्रेमसंबंधात विश्वासघात म्हणजे त्या नात्याचाच अंत. गेल्या काही दशकांत पुरुषांसोबतच महिलांमध्येही व्यभिचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत.
अमेरिकेतील २०२४ च्या ग्लोबल सोशल सर्व्हे (GSS) नुसार २० टक्के पुरुष आणि १३ टक्के महिलांनी जोडीदाराची फसवणूक केली असल्याचे कबूल केले.
युकेतील YouGov च्या २०१९ च्या सर्वेक्षणात २० टक्के पुरुष आणि १० टक्के महिलांनी अशाच कबुलीजबाब दिल्या.
२०१० मध्ये पत्नींकडून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढले असल्याचेही निष्पन्न झाले.
यामागील कारणे विविध आहेत; भावनिक रिक्तता, एकटेपणा, जोडीदाराकडून दुर्लक्ष, कमी आत्मसन्मान, अपेक्षाभंग किंवा सूड घेण्याची मानसिकता.
अनेक वेळा महिलांना त्यांच्या नात्यातून भावनिक आधार, सहानुभूती, कौतुक वा आदर मिळत नाही, त्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीकडून ते शोधू लागतात.