'चांद्रयान-३'च्या प्रक्षेपणासाठी 14 जुलैचीच निवड का?

गोमन्तक डिजिटल टीम

14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटामध्ये असणाऱ्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

ऑगस्ट महिन्याच्या २३ किंवा २४ तारखेपर्यंत चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचेल, अशी माहिती इस्रोने दिली.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

जुलै महिनाच का?

पण तुमच्याही मनात एक प्रश्न पडला असेल, की चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याचीच निवड का करण्यात आली. चला तर जाणून घेऊयात यामागील कारण

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

प्रक्षेपण

जुलै महिन्यात चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे चंद्रमोहीमेची बहुतांश प्रक्षेपणे जुलै महिन्यात केली जातात.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

चंद्रावरील प्रकाश

14 तारीख निवडण्यामागे देखील एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोणत्याही यानाला चंद्रावर लँडिंग करायचं असेल, तर तिथे प्रकाश असणं गरजेचं आहे.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

तारीख

चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्यामुळे तिथे सूर्योदय कधी होतो यानुसार प्रक्षेपणाची तारीख ठरवणं गरजेचं ठरतं.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

दिवस

चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी असल्यामुळे, चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीवरील 14 ते 15 दिवसांचा असतो.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

चंद्र

त्यामुळे हे 15 दिवस चंद्रावर प्रकाश असतो, तर बाकी 15 दिवस अंधार.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak

कालावधी

चंद्रयानाच्या लँडिंगसाठी चंद्रावरील पूर्ण एक दिवसाचा कालावधी गरजेचा आहे. यामुळे यासाठी 14 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Chandrayaan-3 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा