Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.
तो आता व्हेजेटेरियन अर्थात शाकाहारी झाल्याचे अनेकांना माहिती असेल, पण त्याने हा निर्णय का घेतला याबद्दल एका मुखाखतीत खुलासा केला होता.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये तो त्याने शाकाहारी बनण्याचा निर्णय घेण्यामागील त्याचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले आहे.
त्याने सांगितले की त्याच्या मानेमध्ये सुरुवातीला समस्या होती. त्याच्या मणक्यात सुज येत होती आणि त्याचा परिणाम माझ्या हाताच्या मज्जातंतूवर होत होता.
त्याचमुळे त्याला एकाच पद्धतीने १०-१५ मिनिटेही रात्री झोपताना त्रास होत होता. मला सातत्याने उठावे लागत होते.
त्यावेळी ऍक्युपंक्चर ट्रिटमेंट करणाऱ्या त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्याला सांगितले की त्याचे पोट खूप ऍसिडिक झाले आहे, त्यामुळे पोट अल्कालाईन बनवण्यासाठी त्याच्या हाडांमधील कॅल्शियम ओढले जात होते.
विराटने सांगितले की जर पोट खूप ऍसिडिक असेल, तर तुमची शरिराची प्रक्रिया पूर्ण बिघडते. त्यामुळे त्याने त्याला सल्ला देण्यात आा की त्याने डाएट बदलावे
यानंतर विराटने त्याचे पूर्ण डाएट बदलले आणि त्याने शाकाहारी होण्याचा मार्ग निवडला.