Akshata Chhatre
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना योग्य शिस्त आणि वळण लावण्याची चिंता असते.
यासाठी रागावणे किंवा मारणे हा पर्याय नाही, तर मुलांच्या कलाने, सकारात्मक पद्धतीने आणि संयमाने त्यांना समजावणे आवश्यक आहे.
जर एखादे मूल वारंवार गैरवर्तन करत असेल किंवा नियम मोडत असेल, तर त्याला 'टाईम आऊट' द्या.
मुलांना केवळ चुकांसाठी फटकारू नका, तर ते जेव्हा काहीतरी चांगले काम करतात तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक करा.
मुलांना शिस्त लावताना संयम आणि सातत्य हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. एकदा ठरवलेले नियम किंवा शिस्त लावण्याची पद्धत सातत्याने पाळा.
पालकांनी स्वतःच्या वागणुकीतून उदाहरण घालून द्यावे, कारण मुले त्यांच्या पालकांचे अनुकरण करतात
शांतपणे आणि सातत्याने शिस्त लावल्यास मुले एक जबाबदार व्यक्ती म्हणून घडतात.