गोमन्तक डिजिटल टीम
टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. १५० रूपयांपेक्षा जास्त भावाने टोमॅटोची विक्री होत आहे.
टोमॅटोचे भाव अचानक का वाढले असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.
आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. तर टोमॅटोच्या भावानेही कळस गाठला आहे.
उशीरा पडलेल्या पावसामुळे बाजारात होणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे.
यावर्षी मान्सूनच्या पावसाने उशीर केल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
उत्तरेत पाऊस पडत आहे तर दक्षिण भारतात अजून तितकासा पाऊस न पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर मालाची आवक घटून किंमती अजून वाढण्याची शक्यता आहे.
पावसामुळे टोमॅटोचे भाव हे वाढलेलेच आहेत पण त्याचबरोबर कांदा, बटाटा वगळता इतर भाजी दरात वाढ झालेली आहे.