Akshata Chhatre
भारतीय लग्न समारंभ म्हणजे संस्कार, परंपरा, विधी आणि मस्ती यांचं अनोखं मिश्रण. लग्नातली एक रंगतदार प्रथा म्हणजे "जुता चुराई"
जी हिंदी चित्रपट हम आप के हैं कौन मुळे अधिक लोकप्रिय झाली.
वराच्या बुटांवर डोळा ठेवणं आणि ते लपवून पैसे मागणं ही नुसती खोडकर मजा नाही, तर तिच्यामागे एक सामाजिक संदेश दडलेला आहे.
वधूच्या बहिणी किंवा मैत्रिणी वराची छोटीशी परीक्षा घेतात. तो नव्या नात्यांना हसत-खेळत स्वीकारतो का, विनोद आणि मस्करीचा भाग होतो का, हे तपासलं जातं.
वराने जर हसतमुखाने, राग न करता भेटवस्तू देऊन बूट परत घेतले, तर तो समंजस आणि आनंदी स्वभावाचा आहे, हे दाखवून देतो.
या विधीमुळे दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमध्ये हशा, मस्करी आणि गोडवा निर्माण होतो. खरं तर, लग्न हा दोन कुटुंबांचा संगम असतो आणि अशा छोट्या-छोट्या मस्तीतून तो बंध आणखी घट्ट होतो.