विम्बल्डनध्ये पांढऱ्या कपड्यांमध्येच का खेळतात खेळाडू?

Pranali Kodre

ग्रँडस्लॅम

दरवर्षी खेळवण्यात येणाऱ्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक विम्बल्डन स्पर्धा आहे.

Roger Federer | Twitter

जुलै

दरवर्षी जुलैमध्ये इंग्लंडमधील लंडनमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते.

Wimbledon | Twitter

पांढरे कपडे

दरम्यान, या स्पर्धेत सर्व खेळाडू केवळ पांढऱ्या कपड्यांमध्येच खेळताना दिसतात. पण यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे नियम आहे.

Serena Williams | Twitter

सुरुवात

१८८० च्या दशकात टेनिस श्रीमंत आणि प्रतिष्ठीत लोक खेळायचे, त्यावेळी असा नियम लिहिण्यात आलेला. कारण असे मानले जाते की पांढऱ्या कपड्यांवर घामाचे डाग कमी दिसतात.

Rafael Nadal | Twitter

कारण

त्यामुळे कोर्टवर घामाचे डाग कमी दिसावेत म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा सुरू झाली आणि नंतर हाच नियमही करण्यात आला.

Wimbledon | Twitter

नियम

आजही विम्बल्डनच्या नियमांमध्ये कपड्यांच्याबाबत हा नियम आहे. त्यात स्पष्टपणे पांढरे कपडेच घालण्यास सांगण्यात आले आहे.

Novak Djokovic | Twitter

सर्वच सफेद

विशेष म्हणजे खेळाडूंना पूर्ण पांढरे कपडे,पांढरे मोज, पांढरे बँड आणि पांढऱ्या शूजमध्येच खेळावे लागते. त्यावर फक्त एक सेंटीमीटरचीच रंगीत पट्टी चालू शकते.एकदा रॉजर फेडररलाही केशरी सोलचे शुज याच नियमामुळे बदलावे लागले होते.

Roger Federer | Twitter

चर्चा

या नियमाबाबत अनेकदा चर्चाही होते. आंद्रे आगासीने तर १९८८ ते १९९० दरम्यान ही स्पर्धा खेळण्यास नकार दिलेला, पण त्यालाही माघार घ्यावी लागली आणि तो ही स्पर्धा खेळण्यासाठी उतरला.

Andre Agassi | Twitter
Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी