Akshata Chhatre
मिठाईच्या दुकानात प्रवेश करताच आपल्या डोळ्यांना काजू कतली, बर्फी आणि लाडूवर दिसणारी चांदीची किंवा सोन्याची चमचमती वर्क खूप आकर्षित करते.
ही केवळ सजावट नाही, तर शतकानुशतके चालत आलेली परंपरा, इतिहास आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
हा वर्क केवळ दिखाऊ नाही, तर यामागे मुघलकालीन इतिहास, आयुर्वेदिक मान्यता आणि धार्मिक शुद्धतेचा वारसा दडलेला आहे.
वर्क म्हणजे खाण्यायोग्य सोने किंवा चांदीचा अत्यंत पातळ थर होय. पारंपारिकपणे धातूचे छोटे तुकडे पार्चमेंट पेपरमध्ये ठेवून हातोड्याने ठोकून इतके पातळ केले जातात की ते पारदर्शक बनतात.
आधुनिक विज्ञानानुसार, खाण्यायोग्य सोने-चांदी शरीरात शोषले जात नाहीत. FSSAI च्या नियमांनुसार, वर्कची शुद्धता ९९.९% असावी लागते आणि त्यात शिसे, तांबे यांसारखे कोणतेही जड धातू नसावेत.
मिठाईवर वर्क लावण्याची प्रथा मुघलांच्या शाही स्वयंपाकघरातून सुरू झाली. पर्शियन प्रभावामुळे ही परंपरा भारतात आली
आयुर्वेदात चांदीला थंडावा देणारी आणि जिवाणू-विरोधी मानले गेले आहे, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.