Akshata Chhatre
प्रत्येक पालकांना वाटतं की आपलं मूल जबाबदार आणि समजूतदार व्हावं.
मुलांच्या संगोपनातील अनेक लहान गोष्टींपैकी पॉकेट मनी हा एक महत्त्वाचा भाग आहे.
मुलांना लहानपणापासूनच पैशांचे महत्त्व कळते. यामुळे त्यांना खर्च करणे, बचत करणे आणि पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे शिकायला मिळते.
मर्यादित पॉकेट मनीमुळे मुलांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कसे वापरावे लागतात हे कळते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.
स्वतःचे पैसे सांभाळल्यामुळे आणि खर्च केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ते स्वतःचे निर्णय घेऊ लागतात.
यामुळे मुलांना इच्छा आणि गरजा यांमधील फरक ओळखायला शिकता येते.
मुलांना पॉकेट मनी देण्याचे योग्य वय ७ ते ८ वर्षे मानले जाते. या वयात मुलांना पैशांचे महत्त्व समजू लागते.