Akshata Chhatre
तान्ह्या बाळाचं संगोपन करणं हे खरंच एक मोठं कोडं सोडवण्यासारखं आहे. दररोज काहीतरी नवीन घडत असतं आणि पालकांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
तान्ह्या बाळाच्या मुठी कायम घट्ट बंद का असतात? तुम्हीही या प्रश्नाने हैराण झाला असाल, तर काळजी करू नका, कारण ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे.
नवजात बालकांमध्ये 'पामर ग्रास्प रिफ्लेक्स' नावाची एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही बाळाच्या तळहाताला स्पर्श करता किंवा त्याच्या तळहातावर एखादी वस्तू ठेवता, तेव्हा ते आपोआप आपली मूठ घट्ट बंद करतं.
जेव्हा लहान बाळाला भूक लागते, तेव्हा ते त्यांची मूठ चोखण्याचा प्रयत्न करतात. ही क्रिया भूक लागल्याचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.
गर्भाशयात बाळ एका विशिष्ट स्थितीत असते, जिथे त्याचे शरीर वाकलेले आणि हात घट्ट मुठीत असतात. जन्मानंतरही काही काळ हीच सवय कायम राहते.
थंडीच्या वेळी बाळे मुठी दाबून शरीराची उष्णता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
जन्माच्या वेळी बाळांचे स्नायू पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे त्यांना तळवे उघडे ठेवणे कठीण जाते.