Akshata Chhatre
श्रावण महिना सुरू झाला की अनेक पुरुष दाढी वाढवणं थांबवत नाहीत, तर उलट ती वाढवत ठेवतात ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही.
तिच्यामागे विज्ञान आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचे कारणं दडलेली आहेत.
पावसाळ्यात वातावरणात वाढलेला दमटपणा त्वचेला अधिक संवेदनशील करतो. अशा वेळी वारंवार रेजरचा वापर केल्याने त्वचेवर रॅशेस, खाज, लालसरपणा किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
अशा परिस्थितीत वाढवलेली दाढी त्वचेसाठी नैसर्गिक कवचाप्रमाणे काम करते ती धूळ, घाण आणि हवामानातील बदलांचा थेट परिणाम त्वचेवर होऊ देत नाही.
टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन दाढी वाढण्याशी थेट संबंधित आहे. संशोधनात असं दिसून आलंय की दाढी वाढवणं हे या हार्मोनच्या स्थैर्यास मदत करतं, ज्याचा सकारात्मक परिणाम मूड, ऊर्जा पातळी आणि स्नायूंच्या बळकटीवर होतो.
दाढी ठेवणं ही केवळ सौंदर्याची किंवा धार्मिक श्रद्धेची गोष्ट नसून अंतर्गत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.पोटाच्या विकारांनी हैराण आहात? हे वाचा
पोटाच्या विकारांनी हैराण आहात? हे वाचा
धार्मिक दृष्टिकोनातून दाढी ठेवणं संयम, त्याग आणि आत्मनियंत्रणाचं प्रतिक मानलं जातं. हा लहानसा सवयीतील बदल व्यक्तीला स्वतःच्या विचारांशी, भावनांशी आणि जीवनशैलीशी अधिक जोडतो.