Akshata Chhatre
अविवाहित लोक जास्त आनंदी असतात हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं, तरी नुकत्याच झालेल्या एका मोठ्या संशोधनाने याला आधार दिला आहे.
अल्झायमर असोसिएशनच्या अल्झायमर अँड डिमेन्शिया जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार, सिंगल, घटस्फोटित किंवा विधवा-विधुर लोकांना डिमेन्शियाचा धोका जवळपास निम्मा कमी असतो.
तब्बल २४ हजार लोकांवर झालेल्या या अभ्यासातून उघड झालं की विवाहित व्यक्तींमध्ये स्मृतीभ्रंशाचा धोका अधिक आहे.
कारण विवाहित लोकांचे दैनंदिन जीवन मर्यादित आणि कुटुंबकेंद्री असते, तर अविवाहित लोक अधिक सामाजिक राहतात, मित्रमैत्रिणींमध्ये वेळ घालवतात आणि जीवनाचा आनंद घेतात.
तज्ज्ञांच्या मते, सामाजिक संपर्क आणि तणावमुक्त जीवनशैलीमुळे त्यांचा मेंदू सक्रिय राहतो, ज्यामुळे डिमेन्शियाचा धोका कमी होतो.
याउलट, तणावग्रस्त किंवा असमाधानी वैवाहिक नात्यात अडकलेली जोडपी मानसिक थकवा, सततचे वाद आणि नकारात्मक वातावरणामुळे लवकर आजारी पडतात.
अशा परिस्थितीत मेंदूचे आरोग्य बिघडते आणि स्मृतीभ्रंशाचा धोका वाढतो. म्हणजेच, फक्त नातं असणं नव्हे तर त्यात आनंद, आदर आणि मोकळेपणा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.