Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने १६ ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला.
1991 साली महाराष्ट्रातील पालघर येथे जन्मलेल्या शार्दुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगावान गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती.
मात्र, त्याने फलंदाजीतही दाखवलेल्या प्रगतीमुळे आता शार्दुल अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत गणला जातो.
दरम्यान, शार्दुल जेव्हाही चांगली कामगिरी करतो, तेव्हा लॉर्ड शार्दुल ठाकूर असे ट्रेंड व्हायला लागते. पण यामागील नक्की कारण काय? याबद्दल शार्दुलनेच 2022 मध्ये बीसीसीआयशी बोलताना खुलासा केला होता.
शार्दुल म्हणाला होता की त्याला लॉर्ड म्हणायला कोणी सुरुवात केली माहित नाही, पण कदाचीत 2022 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यारून परतल्यानंतर भारतात इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला हे नाव मिळाले असावे.
शार्दुलला लॉर्ड व्यतिरिक्स बुल आणि बिफी ही टोपननावे देखील आहेत.
शार्दुल 2021-2022 दरम्यान फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रात शानदार कामगिरी केली होती. तसेच त्याने भारताच्या प्रसिद्ध गॅबा, ओव्हल आणि सेंच्युरियन कसोटीतील विजयामध्ये महत्त्वाचे योगदानही दिले होते.
शार्दुल बऱ्याचदा प्रतिस्पर्धी संघातील मोठी भागीदारी तोडण्यासाठीही ओळखला जातो. त्याने अनेकदा अशी भागीदारीत तोडत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे.
शार्दुलने आत्तापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 30 विकेट्स घेतल्या असून 4 अर्धशतकांसह 305 धावा केल्या आहेत.
तसेच शार्दुलने भारताकडून 46 वनडे सामने खेळले असून 64 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 1 अर्धशतकासह 329 धावा केल्या आहेत.
शार्दुल 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळला असून 33 विकेट्स घेतल्या आहेत आणि 69 धावा केल्या आहेत.