Akshata Chhatre
अविवाहित किंवा सिंगल राहणाऱ्या अनेक मुलींना एकटेपणा जास्त आनंददायी वाटतो, कारण त्यांना त्यांच्या अंतर्मनाशी एकरूप होता येते.
अनेकदा नात्यांमध्ये मुलींना मिळणाऱ्या दुर्दैवी अनुभवांमुळे त्या या निर्णयापर्यंत पोहोचतात.
अनेकदा नात्यांमध्ये पुरुषांकडून होणारा अनादर किंवा कमी लेखल्याची भावना मुलींना त्रासदायक ठरते.
लग्न झाल्यावर अनेक स्त्रिया पती, मुले आणि कुटुंबाची सेवा करण्यात आपले आयुष्य समर्पित करतात.
एवढे करूनही जेव्हा त्यांना टीकेला सामोरे जावे लागते, तेव्हा त्यांच्या मनाला खोलवर वेदना होतात.
नात्यांमध्ये अनेकदा महिलांना दुय्यम भूमिका निभवायला भाग पाडले जाते. त्यांना काय वाटत आहे, काय हवे आहे हे सांगण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.
घरात किराणा दुकानापासून ते कपड्यांपर्यंत, प्रत्येक गोष्टीत त्यांना पती किंवा मुलांची पसंती विचारात घ्यावी लागते. अशा घुसमटणाऱ्या वातावरणात त्यांना असे वाटते की त्यांचे जीवन पूर्णपणे जगता येत नाही.