Akshata Chhatre
भारतीय संस्कृतीत काही झाडांना पवित्र मानले जाते, तर काही झाडांना भूतांचा वास असतो असे सांगितले जाते.
वड, पिंपळ, आणि चिंच यांसारखी झाडे अनेकदा भूतकथांमध्ये चर्चेत असतात. पण यामागे वैज्ञानिक कारणे आहेत.
वड, पिंपळ आणि चिंच यांसारखी मोठी झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. म्हणूनच, जर एखादी व्यक्ती रात्री या झाडाखाली झोपली तर तिला श्वास गुदमरल्यासारखे वाटू शकते.
ही झाडे खूप मोठी असतात, त्यामुळे त्यांची मुळे सर्वत्र पसरून जमिनीतील पाणी शोषून घेतात.
तसेच, त्यांच्या मोठ्या आकारामुळे इतर लहान झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
काही वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, या झाडांच्या मुळांमधून बाहेर पडणारे काही घटक इतर झाडांसाठी हानिकारक असतात.
रात्रीच्या वेळी एकांतात ही अजस्त्र झाडे पाहून ही भीती अधिक वाढते. आपल्या मनातील भीतीमुळे अगदी लहान आवाजाला किंवा हालचालीलाही आपण भूत समजतो.