दैनिक गोमन्तक
पायापेक्षा हाताची नखे लवकर वाढत असल्याचा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे.
असे का होते हा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का?
मिळालेल्या माहीतीनुसार, आपली नखे केरोटीन नावाच्या प्रथिनापासून बनलेली असतात, हे केरोटीन रक्तातून मिळत असते.
असे म्हटले जाते की हात पायांपेक्षा हृदयाच्या जास्त जवळ आहेत, त्यामुळे त्यांना जास्त शुद्ध रक्तपुरवठा होतो.
तुलनेने पायांच्या नखांना हे शुद्ध रक्त पोहचण्यास जास्त कालावधी लागतो
असेही म्हटले जाते, पायांच्या बोटांपेक्षा हातांच्या बोटांची जास्त हालचाल होते, त्यामुळे जास्त रक्तपुरवठा होतो
काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की, हिवाळ्यात नखांची वाढ कमी होते.