Pramod Yadav
Vacation Destination म्हणून प्रसिद्ध असणारा इथियोपिया देश नैसर्गिकदृष्या खूप संपन्न आहे.
इथियोपियाचा वैविध्यपूर्ण निसर्ग, जैवविविधता आणि इतिहास याचे जगभरातील नागरिकांना आकर्षण राहिले आहे.
इथियोपियाबाबत एक सर्वांना कमी माहिती असलेली गोष्ट म्हणजे हा देश जगाच्या सात वर्षे मागं आहे.
यामागील कारण देखील तेवढंच खास आहे. आणि ते म्हणजे या देशाचं कॅलेंडर.
इथियोपिया देशाचे कॅलेंडर चक्क तेरा महिन्यांचे आहे. यामुळे हा देश जगाच्या सात वर्षे मागे आहे.
जगाने २००१ मध्ये २१ व्या शतकात प्रवेश केला तर इथियोपियाने २००७ मध्ये २१ शतकात प्रवेश केला.
इथियोपिया समृद्ध संस्कृतीशी या कॅलेंडरचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले जाते.