Akshata Chhatre
कोणत्याही कंपनीची खरी शक्ती तिचे कर्मचारी असतात, पण अनुभवी कर्मचारी नोकरी सोडून गेल्यास कामावर आणि संपूर्ण टीमच्या मनोबलावर मोठा परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, व्यवस्थापनाने काही मूलभूत चुकांवर लक्ष दिल्यास कर्मचाऱ्यांचे राजीनामे थांबवता येतात.
अनेकदा कर्मचाऱ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात, ज्यामुळे ते सतत तणावात राहतात आणि चांगल्या कामासाठी प्रशंसा मिळत नाही.
तसेच, गुंतागुंतीचे नियम आणि संसाधनांचा अभाव त्यांची उत्पादकता कमी करतो.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडी आणि कौशल्यानुसार काम न देणे आणि चुकांसाठी जागा नसणे यातून असंतोष निर्माण होतो.
फक्त बोनस नाही, तर शिकण्याची आणि वाढण्याची संधी देणारे वातावरणच कर्मचारी टिकवून ठेवते.
कंपनीच्या नियमांऐवजी माणसांवर लक्ष दिल्यास, समाधानी कर्मचारीच यशाची खरी किल्ली ठरतात.