गोमन्तक डिजिटल टीम
तुम्ही डॉक्टरांना कधी पाहिलं असेल तर ते नेहमी सफेद रंगाचे जॅकेट घालतात. पण जर तुम्ही कधी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांना पाहिलं असेल तर मात्र चित्र वेगळं असतं.
ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कधीच सफेद कपड्यांमध्ये नसतात, तर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असतात. काय आहे यामागील कारण
यामागे एक कारण आहे. एक वेळ होती जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करताना सफेद कपडे घालत असत, पण एका मोठ्या कारणामुळे रंगात बदल करण्यात आला.
काहीवेळा डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तवेळ थांबावं लागत असे. त्यावेळी जास्त काळ पर्यंत रुग्णाचं रक्त पाहावं लागतं.
लाल रक्त पाहिल्यानंतर जर डॉक्टरांनी पांढरे कपडे घातलेल्या आपल्या कर्मचाऱ्याला पाहिलं तर त्याला पांढर्या रंगाऐवजी हिरवा रंग दिसू लागतो.
डॉक्टरला सतत हिरव्या रंगाचा भ्रम होऊ शकतो. याच रंगभ्रम होणाऱ्या या घटनेला 'Visual Illusion' असे म्हटलं जाते.
डॉक्टरांचं लक्ष ऑपरेशनवरुन विचलित होऊ शकतं. ह्याच कारणाने ही गोष्ट लक्षात घेत 20 व्या शतकात एका डॉक्टरने कपड्यांच्या रंगात हा बदल केला.
यामुळे डॉक्टरांच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि रंगाचा भ्रमही होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं.
काही तज्ज्ञांच्या मते, हिरवा किंवा निळा रंग व्यक्तीच्या मनाला शांतता देतं, त्यामुळे एकाग्रता वाढते.