Akshata Chhatre
विवाहबाह्य संबंध म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही, तर हे एक गुंतागुंतीचे आणि भावनिक प्रकरण आहे.
अनेकदा जोडप्यांमध्ये प्रेम किंवा संवादाचा अभाव असल्यामुळे लोक अशा नात्यांमध्ये ओढले जातात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या वैवाहिक जीवनात भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतो.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या लग्नात भावनिक रिकामेपणा अनुभवते आणि प्रेमाच्या शोधात दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, चॅटिंग ॲप्स किंवा डेटिंग वेबसाइट्सद्वारे भावनिक किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. यामध्ये ओळख लपवली जाते, पण त्याचा मानसिक परिणाम खूप खरा असतो.
अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळींमध्ये एखाद्या व्यक्तीशी इतके जवळचे संबंध निर्माण होतात की ते भावनिक आसक्तीत रूपांतरित होतात.
काही लोक फक्त शारीरिक संबंधांसाठी अशा नात्यांमध्ये जातात. त्यांना एका नात्यात समाधान मिळत नाही आणि ते वारंवार नवीन जोडीदार शोधत राहतात.