Akshata Chhatre
जाड, लांब आणि रेशमी केसांचे सौंदर्य नेहमीच वेगळे भासत आले आहे. फॅशनचे ट्रेंड बदलत असले तरी कधी लहान केसांचा, तर कधी लांब केसांचा क्रेझ वाढत राहतो.
पुरुषांना मोकळे केस असलेल्या मुली इतक्या का आवडतात? यामागे केवळ सौंदर्य नाही, तर विज्ञान, इतिहास आणि संस्कृती यांचाही मोठा संबंध आहे.
मानेपासून हातापर्यंत पोहोचणारे केस तरुणाई, निरोगीपणाचे प्रतीक असतात आणि पुरुष मोकळे केस असलेल्या महिलांना अधिक आकर्षक आणि तरुण मानतात.
संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, लांब केस हे स्त्रीत्व आणि सौंदर्याचे शाश्वत प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत तर लांब केसांना पारंपरिक सौंदर्याचा अविभाज्य भाग मानले जाते.
चित्रपट, साहित्य आणि कलाकृतींमध्ये मोकळे केस असलेल्या महिलांना आदर्श आणि मोहक रूपात सादर केले जाते, ज्याचा पुरुषांच्या मनावर खोलवर परिणाम होतो.
मानसशास्त्रीयदृष्ट्या, मोकळे केस हे लैंगिक आकर्षणाचे लक्षण मानले जाते. केस फिरवणे, त्यांच्याशी खेळणे किंवा फ्लर्टसाठी वापरणे हे अनेकदा संकेत असतात.
त्यामुळे पुरुषांचे लक्ष सहजपणे लांब, रेशमी आणि मोकळ्या केसांकडे जाते.