Sameer Amunekar
आजच्या काळात मूल वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तयारी लागते. शिक्षण, आरोग्य, राहणीमान आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता अनेक कपल्स आर्थिकदृष्ट्या स्थिर होईपर्यंत वाट बघतात.
विशेषतः शहरांमध्ये राहणारे जोडपे आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असतात. promotions, higher studies किंवा नोकरी बदल अशा अनेक करिअरच्या जबाबदाऱ्या पार पडेपर्यंत पालकत्व टाळलं जातं.
मूल होणे म्हणजे एक मोठी जबाबदारी. अनेक कपल्सना आधी काही वर्षं एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो, प्रवास करायचा असतो, स्वतःसाठी जगायचं असतं — त्यामुळे ते पालकत्व काही काळासाठी पुढे ढकलतात.
मूल वाढवणं केवळ आर्थिक किंवा सामाजिक जबाबदारी नाही, तर ती एक मानसिक जबाबदारीसुद्धा आहे. काही कपल्सना पालक होण्यासाठी भावनिकदृष्ट्या तयार व्हायला वेळ लागतो.
काही वेळा वैद्यकीय कारणांमुळेही गर्भधारणेत विलंब होतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, थायरॉईड, अथवा इतर आरोग्यविषयक अडचणी यामुळे कपल्सना प्लॅनिंग पुढे ढकलावं लागतं.
विवाह वय वाढणं, लिव्ह-इन रिलेशनशिप्स वाढणं, जीवनशैलीतील बदल, करिअरकेंद्रित जीवन हेही काही प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे लोक पालकत्वासाठी उशीर करतात.