Pranali Kodre
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमध्ये 7 जून 2023 पासून इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर होत आहे.
साल 2021 ते 2023 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे दुसरे पर्व खेळवण्यात आले आहे. यापूर्वी 2019 साली कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिले पर्व 2019 ते 2021 दरम्यान खेळवण्यात आले होते.
पहिल्या पर्वाचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला होता. त्यावेळी भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने पराभूत केले होते.
दरम्यान अनेकांना कसोटी चॅम्पियनशीपचे सलग दोन अंतिम सामने इंग्लंडलाच का खेळवण्यात आले असा प्रश्न पडला आहे. पण यामागे महत्त्वाचे कारण आहे.
दोन वर्षांच्या कालावधीत चालणाऱ्या या कसोटी चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतील साखळी सामने मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान संपतात. त्यामुळे जूनमध्ये अंतिम सामना होतो.
जूनमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्ये क्रिकेट खेळण्यात तेथील वातावरणामुळे अडचणी येऊ शकतात.
कारण जूनमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा काही क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख संघांच्या देशांमध्ये एकतर पावसाळा सुरू असतो किंवा काही देशांमध्ये खूप थंडी किंवा तीव्र उन्हाळा असतो.
पण इंग्लंडमध्ये जून महिन्यात वातावरण बऱ्यापैकी साफ असते, तसेच मे ते सप्टेंबरपर्यंत इथे उन्हाळा असल्याने पर्यटकपण येत असतात. त्यामुळे क्रिकेटला त्याचा फायदा होतो.
अशाच कारणांमुळे इंग्लंडला कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवण्यासाठी पसंती दिली जाते.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियातील अंतिम सामन्यानंतर 16 जूनपासून सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेने कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे.