दैनिक गोमन्तक डिजिटल
पावसाळ्यातील दमट हवामान (Humidity) जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते.उघड्यावरील अन्नावर हे सूक्ष्मजंतू खूप वेगाने वाढतात, ज्यामुळे अन्न लगेच दूषित होते.
या दिवसांत कचरा आणि साचलेल्या पाण्यावर बसणाऱ्या माश्या थेट उघड्या अन्नावर बसतात.माश्यांच्या पायांना चिकटलेले जंतू अन्नात मिसळून कॉलरा, टॉयफॉईड आणि जुलाब यांसारखे आजार पसरवतात.
स्ट्रीट फूड तयार करताना किंवा भांडी धुण्यासाठी अनेकदा उघड्यावरील किंवा दूषित पाण्याचा वापर होतो. दूषित पाण्यामुळे पाणीजन्य आजार (Waterborne Diseases) आणि पोटाचे गंभीर संसर्ग होतात.
हवेतील आद्रतेमुळे शिजवलेले अन्न उघड्यावर ठेवल्यास लवकर खराब होते.शिळे किंवा उघड्यावर राहिलेले अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरित्या थोडी मंदावलेली असते.उघड्यावरील तेलकट, मसालेदार आणि दूषित अन्न पचण्यास जड जाते, ज्यामुळे ॲसिडिटी व अपचन होते.
हवामानातील बदलांमुळे पावसाळ्यात शरीराची इम्युनिटी कमी होते.अशा वेळी उघड्यावरील दूषित अन्न खाल्ल्याने शरीर लगेच आजारांना बळी पडते.
रस्त्यावरील स्टॉल्सवर वारंवार तेच तेल वापरणे किंवा निकृष्ट दर्जाच्या भाज्यांचा वापर केला जातो.हे अन्न शरीरात विषारी घटक (Toxins) वाढवते, ज्यामुळे यकृत आणि पोटाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.