Manish Jadhav
उन्हाळ्यात आरोग्याबरोबर आहाराची देखील काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात सर्सासपणे कलिंगडाचे सेवन केले जाते.
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि लायकोपीन सारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
पण कलिंगडासोबत पुढील काही पदार्थांचे अजिबात सेवन करु नका. या पदार्थांचे चुकूनही कलिंगडासोबत सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते.
कलिंगडाचे सेवन केल्यानंतर दूध पिऊ नका कारण आयुर्वेदानुसार दूध आणि टरबूजचे स्वरुप वेगळे आहे.
कलिंगडाचे सेवन केल्यानंतर लगेच अंडी खाऊ नयेत, यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता होते.
कलिंगडाचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नये कारण असे केल्याने कलिंगड पचण्यास त्रास होतो.