Kavya Powar
आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अनेकांना तहान लागते. यामागे शास्त्रीय कारणही आहे.
एका संशोधनानुसार जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता तेव्हा त्यातील घटक रक्तात मिसळतात शरीरात पसरतात
यानंतर पेशी पाणी शोषू लागतात. आपला मेंदू ही संपूर्ण प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्यातील एका छोट्या भागाला सिग्नल पाठवतो.
त्याला हायपोथालेमस म्हणतात. या सिग्नलमुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान लागते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता तेव्हा 15 मिनिटांनीच पाणी पिण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता.