Akshata Chhatre
तुम्ही जर कधी विमानाने प्रवास करताना सीट नंबरकडे लक्ष दिले असेल, तर तुम्हाला एक विचित्र गोष्ट नक्कीच लक्षात येईल बहुतेक एअरलाईन्समध्ये १३ क्रमांकाची कोणतीही रांग नसते.
रांग १२ नंतर थेट १४ क्रमांकाची रांग सुरू होते. यामागे केवळ योगायोग आहे की एखादे ठोस कारण?
हा कोणताही योगायोग नसून, त्यामागे एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, ज्यामध्ये काही मनोरंजक कारणे दडलेली आहेत.
पाश्चात्त्य संस्कृतीत १३ ला अशुभ मानले जाते. या भीतीला 'ट्रिस्काइडेकाफोबिया' असे म्हणतात.
विमानाने प्रवास करणे तणावपूर्ण असू शकते, विशेषतः ज्या प्रवाशांना उड्डाणाची भीती वाटते. एअरलाइन्सची इच्छा असते की त्यांचे ग्राहक प्रवासादरम्यान शक्य तितके शांत आणि आरामदायक अनुभव घ्यावेत.
जर सीट नंबरमुळे प्रवाशाच्या मनात भीतीची भावना निर्माण होत असेल, तर तो क्रमांक काढून टाकणे हे कंपन्यांसाठी मानसिक आणि व्यावसायिक दृष्ट्या एक हुशारीचे पाऊल आहे.
विशेष म्हणजे, ही प्रथा केवळ १३ क्रमांकापुरती मर्यादित नाही. इटली आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये १७ या क्रमांकाला अशुभ मानले जाते.