Pranali Kodre
भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
२९ ऑगस्ट रोजीच राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे या दिवशी मेजर ध्यानचंद यांची जयंती असते.
हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे जन्म झाला होता.
मेजर ध्यानचंद यांच्या १०७ व्या जयंती निमित्त २०१२ साली २९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा भारतात क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
ध्यानचंद यांनी १९२६ ते १९४८ दरम्यान भारतीय हॉकीमध्ये खेळाडू म्हणून मोठे योगदान दिले.
ध्यानचंद यांनी भारतासाठी १८५ सामन्यांमध्ये ४०० पेक्षा अधिक गोल केले.
ध्यानचंद यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 मध्ये ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात दिलेले अतुलनीय योगदान लक्षात घेता भारतीय सरकारने २०१२ मध्ये २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केला.