Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या उर्वरित वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी हार्दिकचा बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
२७ वर्षीय वेगवान गोलंदाज असलेला प्रसिद्ध कृष्णा देशांतर्गत क्रिकेट कर्नाटक संघाकडून खेळतो.
तसेच प्रसिद्ध कृष्णा आत्तापर्यंत 17 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत.
कृष्णाने वनडेत 29 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने त्याच्या कारकिर्दीत लिस्ट ए क्रिकेटमध्ये 67 सामन्यात 113 विकेट्स घेतल्या आहेत.
तो नुकतेच वर्ल्डकप 2023 पूर्वी सप्टेंबरच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत खेळला होता, ज्यात त्याने 2 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या.