Pramod Yadav
गोव्याच रॅपर नॅथन जोसेफ मेंडिस याची सध्या गोव्यासह सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
मुळचा मडगावचा असणारा नॅथन मेंडिसचे टोपण नाव त्सुमायोकी असून याच नावाने तो जास्त ओळखला जातो.
रॅपर त्सुमायोकी याला MTV युरोपियन संगीत पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
नॅथनच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मडगाव येथे 2001 साली जन्मलेला नॅथन अवघ्या 22 वर्षांचा असून, तरुण वयात त्याने मोठे यश संपादन केले आहे.
मेसेज फ्रॉम द मून, दाबोजी, आरआयपी, वे टु मेस्सी असे काही अल्बम त्याचे प्रसिद्ध आहेत.
पिंक ब्ल्यु, एक दो एक, इट्स ऑलराईट, परफेक्ट लाईन यासारखी विविध गीते युवा वर्गात प्रसिद्ध आहेत.