Akshata Chhatre
कोणत्याही नात्यातील विश्वासघात अचानक मोठा अफेअर किंवा सिक्रेट चॅटने सुरू होत नाही.
तो अनेकदा कपल दुर्लक्ष करतात अशा छोट्या-छोट्या भावनिक दरीतून नात्यात प्रवेश करतो.
पुरुष जास्त धोका देतात की महिला, याचे उत्तर सरळ नाही. धोक्याचे प्रमाण परिस्थितीवर आणि नात्यातील भावनिक रिकामेपणावर अवलंबून असते.
पुरुष जास्त धोका देतात, पण महिला अधिक स्मार्टपणे धोका देतात." महिला पूर्ण योजना आखून विश्वासघात करतात, तर पुरुष अनेकदा विचार न करता मूर्खपणामुळे फसतात.
पुरुषांना अनेकदा भावनिक कनेक्शनची कमतरता वाटल्याने धोका देतात, तर महिलांना नात्यात ऐकले किंवा समजून घेतले जात नाही असे वाटल्याने धोका देतात.
महिलांना मात्र प्रेमाच्या ठिकाणी कोणी दुसऱ्याने जागा तर घेतली नाही, याची भीती वाटते, म्हणून त्या भावनिक प्रश्न विचारतात.
धोका कोणीही दिला तरी, तो लपवण्याच्या आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती स्त्री-पुरुषांमध्ये पूर्णपणे वेगळ्या असतात.