Rahul sadolikar
भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचं श्रेय हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस स्वामिनाथन यांना जातं.
हरित क्रांतीच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षांत फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन 3 पटीने वाढले आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे.
अर्थात दुग्धक्रांती करण्यासाठी डॉ. वर्गीस कुरियन यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. एकेकाळी दुग्धोत्पादनात प्रचंड पिछाडीला असणाऱ्या भारताला त्यांनी आज दुग्धोत्पादन करणारा सर्वात मोठा देश अशी ओळख मिळवून दिली.
सहकारी तत्त्वावरच्या दुध उत्पादन संस्थांची स्थापना आणि कल्पना डॉ. वर्गीस कुरियन यांची होती. अमूलची स्थापनाही डॉ कुरियन यांनीच केली होती.
सुवर्णक्रांती अर्थात गोल्डन रिव्होल्युशनचे श्रेय निरपाख तुतीज यांना जातं. मध, फलोत्पादनात भारताची मान उंचावण्याच्या महान कामगिरीसाठी त्यांना सुवर्णक्रांतीचे जनक मानले जाते.
नीलक्रांती अर्थात ब्लु रिव्होल्युशनचे जनक डॉ. हरिलाल चौधरी यांना मानलं जातं. मासे उत्पादनात केलेल्या क्रांतीला नीलक्रांती असं म्हटलं जातं.
पीतक्रांती अर्थात यलो रिव्होल्युशचे जनक डॉ. सॅम पित्रोदा यांना मानलं जातं.
पीतक्रांती म्हणजेच भारतात तेलबियांच्या उत्पादनात झालेला क्रांतीकारक बदल .