Akshay Nirmale
रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताना भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) प्रवाशांना विमा देखील प्रदान करते.
हा पर्याय ऐच्छिक असला तरी प्रवाशांसाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम विमा संरक्षण पर्याय असू शकतो.
जेव्हा तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट IRCTC वेबसाइटवरून बुक करता तेव्हा तुम्हाला पेमेंट प्रक्रियेदरम्यान प्रवास विम्याचा पर्याय मिळतो.
हा पर्याय निवडल्यास, तुम्हाला हे विमा संरक्षण 35 पैशांत मिळते. विशेष बाब म्हणजे एका PNR द्वारे बुक केलेल्या सर्व प्रवाशांना ते लागू होते.
प्रवासादरम्यान अपघातात प्रवासी जखमी झाल्यास 2 लाख रूपये मिळतात.
अपघातात कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रूपये.
अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थिवाच्या वाहतुकीसाठी 10,000 रुपये आणि मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.