Akshay Nirmale
मार्केट कॅप म्हणजे मार्केट कॅपिटल. शेअर मार्केटमध्ये एका शेअरचा सध्याचा भाव गुणिले त्या शेअर्सची एकूण संख्या याचे उत्तर म्हणजे त्या शेअरची मार्केट कॅप.
आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी अॅपल ची मार्केट कॅप जगात सर्वाधिक 2.71 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.
बिल गेट्स यांची कंपनी मायक्रोसॉफ्टची मार्केट कॅप 2.3 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.
सौदी अरेबियाची पेट्रोकेमिकल कंपनी सौदी अरामको या यादीत तिसऱ्या स्थानी असून तिची मार्केट कॅप 2.1 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.
गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटची मार्केट कॅप 1.35 ट्रिलियन डॉलर इततकी आहे.
अमेरिकन कंपनी NVIDIA ची मार्केट कॅप 711 बिलियन डॉलर आहे.
जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार मानले जात असलेले वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनीची मार्केट कॅप 703 बिलियन डॉलर इतकी आहे.
फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटा ची मार्केट कॅप 592 बिलियन डॉलर इतकी आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीची मार्केट कॅप 537 बिलियन डॉलर इतकी आहे.