Akshata Chhatre
पावसाळ्यात नटलेलं गोव्याचं सौंदर्य केवळ डोळ्यांचं नव्हे, तर मनाचंही भरण पोषण करतं.
हिरवाईने बहरलेली भूमी, धुक्याने झाकलेले डोंगरदऱ्यांचे दृश्य आणि समुद्रकिनाऱ्याच्या लाटांसोबत वाहणारा थंड वारा या सगळ्याचा अनुभव घेताना गोवा काहीसा वेगळाच भासतो.
ओल्ड गोव्यातील टेकडीवर वसलेलं 'आवर लेडी ऑफ द रोझरी' चर्च मांडवी नदीकाठचं अप्रतिम दृश्य दाखवतं; सूर्यास्ताच्या वेळी इथला नजारा अधिकच मोहक वाटतो.
उत्तर गोव्यातील शापोरा किल्ला ज्याची ओळख 'दिल चाहता है' चित्रपटामुळे वाढली. समुद्र आणि नदीच्या संगमाचं रमणीय दृश्य समोर आणतो.
याच परिसरातील व्हागातोर हिलटॉप हे ठिकाण पावसात अधिकच शांत, आल्हाददायक आणि सौंदर्याने भारलेलं वाटतं.
पावसाळ्याच्या या दिवसांत गोव्यातील प्रत्येक कोपरा नवे रंग, नवे अनुभव घेऊन उलगडत असतो.
अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या या नजाऱ्यांमुळे गोवा खऱ्या अर्थाने 'मॉन्सून मॅजिक' ठरतो.