Akshata Chhatre
लग्नाच्या नात्यात कधी प्रेमाचा अभाव असतो, तर कधी संवादाचा. कधीकधी बाहेरच्या दुनियेचा आकर्षक झगमगाट विवाहितांना चुकीच्या मार्गावर नेतो आणि नात्याचा पाया डळमळीत होतो.
विवाहबाह्य संबंध म्हणजे फक्त लग्नाशिवाय कोणाबरोबर नातं जोडणं एवढंच नाही हा भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्तरांवर गुंतागुंतीचा विषय आहे.
जेव्हा वैवाहिक जीवनात भावनिक नात्याची उणीव जाणवते, तेव्हा व्यक्ती प्रेमाच्या शोधात दुसऱ्याकडे आकर्षित होऊ शकते. अशा नात्यांमध्ये उत्कटता आणि भावना यांचं मिश्रण असतं.
राग, एकटेपणा किंवा मद्याच्या प्रभावाखाली झालेला संबंध, ज्यात भावनिक गुंतवणूक नसते आणि नंतर पश्चात्ताप होतो.
डिजिटल युगात सोशल मीडिया, चॅट अॅप्स किंवा डेटिंग साइट्सद्वारे निर्माण होणारे भावनिक किंवा शारीरिक संबंध, ज्यात ओळख लपवलेली असते पण परिणाम खरे असतात.
मित्र किंवा सहकाऱ्याशी गप्पा मारता मारता निर्माण होणारं खोल भावनिक नातं, जे कधी कधी खऱ्या जोडीदारापेक्षा अधिक मजबूत वाटू शकतं.
केवळ शारीरिक संबंधांसाठी जोडीदार बदलत राहणे, ज्यात भावनांचा अभाव असतो.