Akshata Chhatre
मानवी जीवनात नाती ही खूप महत्त्वाची असतात. काही नाती आपल्याला जन्मतः मिळतात, जसे की आई-वडील, भावंडं, तर काही नाती आपण आयुष्यात अनुभव घेताना स्वतः जोडतो, जसे की मित्र, जोडीदार किंवा आयुष्यभर साथ देणारे साथीदार.
प्रत्येक नात्याची एक वेगळी ओळख आणि खासियत असते. डेटिंग हे हलकंफुलकं नातं असतं, जिथे दोन व्यक्ती एकमेकांना ओळखण्याचा, समजून घेण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात.
त्यामध्ये फारसं कमिटमेंट नसतं, तर मजा, गप्पा आणि रोमान्स असतो. त्यानंतरचा टप्पा म्हणजे कमिटेड रिलेशनशिप, जिथे जोडीदार एकमेकांशी निष्ठेचं वचन देतात आणि नात्याबद्दल गंभीर होतात.
त्याचबरोबर काही नाती सिच्युएशनशिपच्या स्वरूपाची असतात, जिथे स्पष्टता नसते आणि दोघंही त्यांच्या भावनांचा शोध घेत असतात.
दुसरीकडे कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये अपेक्षा नसतात; फक्त एकमेकांसोबतचा वेळ, जवळीक आणि गप्पा यावर भर असतो.
काही वेळा अशा नात्यांना भावनिक आधार नसतो आणि ते फक्त इच्छांची पूर्तता करण्यापुरते मर्यादित राहतात.
त्यामुळे आपण कोणत्या नात्यात आहोत हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे