Akshata Chhatre
भारतीय संस्कृतीमध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी काही विशिष्ट नियम पाळावे
कारण याचा त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.
धार्मिक समजुतींनुसार, ग्रहणाच्या वेळी चंद्र किंवा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊ नये. त्यामुळे गर्भवती महिलांनी घरातच राहणे योग्य मानले जाते
धार्मिक नियमांनुसार ग्रहणाच्या वेळी पाणी पिऊ नये किंवा काही खाऊ नये, असे सांगितले जाते. मात्र, गर्भवती महिलांसाठी हे नियम पाळणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
ग्रहणकाळात सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे टाळावे असे म्हटले जाते. ही एक सामान्य समजूत आहे, जी अनेक लोक पाळतात.
विज्ञान या सर्व समजुतींना कोणताही आधार देत नाही. चंद्रग्रहण डोळ्यांसाठी हानिकारक नसते आणि त्याचा गर्भवती महिलेच्या आरोग्यावर किंवा बाळाच्या वाढीवर कोणताही थेट परिणाम होत नाही.
हे लक्षात घ्या की विज्ञानानुसार हे केवळ एक खगोलीय घटना आहे आणि यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.