गोमन्तक डिजिटल टीम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्याची लोकसंख्या सध्या 15.7 लाख इतकी आहे.
गोव्यातील 15.7 लाख लोकसंख्येपैकी 7.9 लाख (50.4 टक्के) पुरुष आहेत आणि 7.8 लाख (49.6 टक्के) महिला आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 14.6 लाख होती.
गोव्यातील अंदाजित लोकसंख्येपैकी 75.8 टक्के शहरी असल्याचे अहवालात नोंदवले गेले आहे.
दोन वर्षांपूर्वी गोव्याच्या शहरी भागात 11.5 लाख लोक राहत होते, आज जवळपास 12 लाख लोक शहरांमध्ये राहत आहेत.
गोव्यातील ग्रामीण लोकसंख्या 2021 मध्ये 4.2 लाखांवरून 2023 मध्ये 3.8 लाखांवर आली आहे.
गेल्या दशकात गोव्याच्या ग्रामीण लोकसंख्येतील सरासरी घट 1.2 टक्के आहे.