Akshata Chhatre
स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, भारतात दर दुसरी व्हिस्कीची बाटली विकली जाते. विशेषतः भारतात व्हिस्की सोड्यासोबत पिण्याची परंपरा खूपच लोकप्रिय आहे.
पण ही सवय नक्की का लागली यामागचं वैज्ञानिक आणि सामाजिक कारण काय?
व्हिस्कीमध्ये 40 ते 50 टक्के अल्कोहोल असते. थेट व्हिस्की प्यायल्यास घशात जळजळ होते आणि त्यामुळे पिणं कठीण जाते.
सोडा ही जळजळ कमी करतो आणि शरीर थंड ठेवतो. आधी भारतात प्रिमियम व्हिस्की सहज उपलब्ध नव्हती, त्यामुळे सोड्यामुळे त्याची चव सौम्य आणि पिण्यायोग्य होत असे.
सोडा टाकल्याने व्हिस्कीतील एरोमॅटिक कंपाउंड्स अधिक खुलतात आणि त्याचा फ्लेवर चांगला अनुभवाला येतो.
पचनाच्या दृष्टीनेही हे सौम्य ठरतं कारण थेट पिल्यास पोटाला त्रास, ऍसिडिटी आणि यकृताला हानी होऊ शकते.
तरीही, हे विसरून चालणार नाही की कोणत्याही स्वरूपात अल्कोहोल आरोग्यासाठी हानिकारकच आहे.