Akshay Nirmale
पावसाळा सुरू झाला हवामान विभाग पावसाबाबत अंदाज व्यक्त करत असतो. त्यामध्ये रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन असे अलर्ट दिले जातात.
या प्रत्येक अलर्टला एक अर्थ आहे. तो प्रत्येकाला माहिती असेलच असे नाही. या प्रत्येक अलर्टची माहिती घेऊया.
रेड अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे. धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो. रेड अलर्टच्या काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
रेड अलर्ट हा सर्वात धोकादायक अलर्ट असतो. अतिवृष्टी, चक्रीवादळ, अन्य आपत्तीची शक्यता असते तेव्हा आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क असतात.
वीज पुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार ऑरेंज अर्लट काळात घडू शकतात. गरज असेल तरच बाहेर पडायला हवे, असा याचा अर्थ असतो. यातील परिस्थिती रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असते.
पुढील काही दिवसात हवामान बदलामुळे नैसर्गिक संकट ओढवू शकते, हे सांगण्यासाठी प्रशासन यलो अलर्ट जारी करते. दैनंदिन कामे रखडू शकतात. रेड आणि ऑरेंजच्या तुलतेन यलो अलर्ट कमी धोकादायक असतो.
नैसर्गिकृष्ट्या कोणतेही संकट नाही, सर्वकाही ठीक आहे, हा संकेत लोकांना देण्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला जातो. सर्व अलर्टच्या तुलनेत ग्रीन अलर्टमध्ये आपण सर्वाधिक सुरक्षित आहोत, असे मानले जाते.