Pranali Kodre
भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर कपच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 11 सप्टेंबर रोजी 228 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे हा केएल राहुलचा पुनरागमनाचा सामना होता. त्यात त्याने शतक केल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती.
दरम्याने अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की त्याला केएल असे म्हटले जात असले तरी त्याचे पूर्ण नाव काय?
तर केएल राहुलचे पूर्ण नाव आहे कन्नूर लोकेश राहुल.
कन्नूर लोकेश या नावाची अद्याक्षरे त्याच्या नावापुढे लावल्याने तो केएल राहुल म्हणून ओळखला जातो.
बंगळुरूमध्ये जन्मलेल्या केएल राहुलने आत्तापर्यंत 174 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
केएल राहुलने 174 सामन्यांमध्ये 38.27 च्या सरासरीने 15 शतकांसह 7004 धावा केल्या आहेत.