Kavya Powar
प्रत्येकाला सुंदर आणि दाट केस हवे असतात. मात्र यासाठी केसांची निगा राखणेही खूप गरजेचे आहे.
दिवसातून एकदाही केस न विंचरल्याने केस खराब होतात हे तुम्हाला माहीत आहे का?
केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी केस विंचरणे आवश्यक आहे. कंगव्यामुळे केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, केस मजबूत होतात
त्यामुळे केसांची चमकही वाढते. आता दिवसातून किती वेळा विंचरावे हा एक प्रश्न आहे
केस निरोगी ठेवण्यासाठी, दिवसातून किमान दोनदा विंचरणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा केस विंचरावे
याशिवाय केसांच्या लांबी आणि गरजेनुसार तुम्ही दिवसाच्या इतर वेळीही केस विंचरु शकता
लांब केस सहज गुंफतात, त्यामुळे हे टाळण्यासाठी दिवसातून किमान ३ वेळा केस विंचरावे . यामुळे केस तुटणे आणि कमकुवत होणे थांबते.